उपनगर येथे चंदनाचे झाड चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:11 IST2020-02-17T01:10:00+5:302020-02-17T01:11:02+5:30

उपनगर येथे सात हजार किमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी खोडापासून तोडून चोरून नेले.

Steal sandalwood in the suburbs | उपनगर येथे चंदनाचे झाड चोरीस

उपनगर येथे चंदनाचे झाड चोरीस

नाशिकरोड : उपनगर येथे सात हजार किमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी खोडापासून तोडून चोरून नेले. उपनगरच्या श्रमनगर येथील गुरु कृपा बंगल्याच्या आवारात श्रीराम देवीदास बैरागी यांचे चंदनाचे झाड होते.
शनिवारी (दि.१५) रात्री अज्ञात चार चोरट्यांनी सात हजाराचे चंदनाचे झाड करवत व कोयत्याच्या सहाय्याने बुडापासून तोडून चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Steal sandalwood in the suburbs