कांदा निर्यातसंदर्भात शेतकरी संघटनेचे इगतपुरी तहसिलदारांना निवेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 17:02 IST2020-09-16T16:57:57+5:302020-09-16T17:02:44+5:30
नांदूरवैद्य : केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातबंदिचा निर्णय घेतल्यानंतर इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.

शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे इगतपुरी तालुका सर्व पदाधिकारी.
नांदूरवैद्य : केंद्र सरकारने पुन्हा कांदा निर्यातबंदिचा निर्णय घेतल्यानंतर इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातली. हा निर्णय शेतकर्यांसाठी अन्यायकारक असून कांदा निर्यातबंदी ताबडतोब हटविण्याची मागणी इगतपुरी तालुका शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्रीय वाणज्यि मंत्रालयाने कोणतीही पूर्वकल्पना न देता कांदा निर्यातबंदी चे परिपत्रक काढल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांसह निर्यातदारांना मोठा धक्का बसलेला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कांदा आवश्यक वस्तुच्या कायद्यातून वगळलेला असताना केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी घातलेली आहे. हे बेकायदेशीर आहे याचा निषेध करण्यासाठी व केंद्र शासनाचा हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी केंद्र सरकारचा जाहीर निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, संपर्क प्रमुख रामदास गायकर, कोषाध्यक्ष रामनाथ जाधव, उपाध्यक्ष अरु ण जुंद्रे, संघटक गट पांडुरंग शेंडे, महेश मालुंजकर, भाऊसाहेब गायकर आदी उपस्थित होते.