शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचा बंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:07 IST

लासलगाव : महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती कांदा उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली .

ठळक मुद्देभारत दिघोळे : थोडाच कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जाण्याचे आवाहन

लासलगाव : महाराष्ट्रातील एकही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही, अशी माहिती कांदा उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली . केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी करून परदेशातील कांदा आयात करण्याचा आदेश काढून तसेच कांद्याचे किरकोळ साठी २ टनाचे आणि होलसेलसाठी २५ टनांचे स्टॉक लिमिटची मर्यादा घालून दिल्याने कांद्याचे दर घसरले आहे. परंतु दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच चाळीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी आपला कांद्याची चांगली प्रतवारी करून अगदी थोडा थोडा कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जायचा आहे, असे सांगितले. तसेच ह्यबंद, बंद, बंदह्ण अशाप्रकारे जो काही मेसेज राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे. त्या मेसेजचा आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा कुठलाही संबंध नाही बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवल्याने परत जेव्हा बाजार समित्या सुरू होतील तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन सरकारचा कांद्याचे भाव पाडण्याचा हेतू उलट सफल होईल.कांद्याचे लिलाव रोजच्या रोज व सुरळीत पद्धतीनेच सुरू राहावे हीच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची अधिकृत भूमिका आहे. फक्त कांदा उत्पादक बांधवांनी आपल्या जवळच्या किंवा सोयीच्या बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन जात असताना तो अगदी थोडा थोडा घेऊन जावा जेणेकरून बाजार समितीमध्ये कांद्याची एकदम आवक होणार नाही व सरकारला कांद्याचे दर पाडण्याचे जे काही षडयंत्र करायचे आहे ते यशस्वी नाही होणार महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहतील याची राज्यभरातील सर्व कांदा उत्पादकांनी नोंद घेण्याबद्दल ते म्हणाले.केंद्र सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन करून विरोध केला जाईल. परंतु बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार नाही. पाकिस्तानने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याची जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारताने कांदानिर्यात खुली करावी यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सोमवारी (दि.२६) ऑक्टोबर रोजी सर्व घटक जसे की मार्केट कमिटी सभापती, सचिव, व्यापारी हमाल, मापारी यांच्याशी चर्चा करतील. अशी माहितीही दिघोळे राज्य प्रवक्ते शैलेश पाटील, राज्य प्रवक्ते व वाखारी येथील शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पवार यांनी दिली.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार