शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

बहारदार सादरीकरणाने कथ्थक उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:50 AM

यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला.

नाशिक : यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला.नवी दिल्लीचे कथ्थक कला केंद्र आणि नाशिकच्या कीर्ती कलामंदिरच्या वतीने नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात शुक्रवारपासून तीनदिवसीय कथ्थक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी भगवान नटराजाच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नृत्यांगना कमलिनी अस्थाना, रेखा नाडगौडा, किशोर अहिरे, शोभना दातार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कीर्ती कलामंदिरच्या आदिती नाडगौडा-पानसे आणि कोलकाताच्या सायानी चावडा यांनी ‘दी जे दरस मोहे’ ही नऊ मात्रेच्या तालात गणेशवंदना सादर केल्यानंतर पं. वि. दि. पलुस्कर यांच्या रचनेवर आधारित बंदीश सादर केली. यावेळी त्यांच्यासह श्रिया गुणे- अंडे, मधुश्री वैद्य, दुर्वाक्षी पाटील, शुभलक्ष्मी बालाजीवाले, कृष्णा देशमुख, तन्वी मोरे, दीक्षा दत्ता, मानसी पवार यांनी सहभाग नोंदविला.दिल्लीतील कथ्थक केंद्राच्या नर्तकांनी ‘लक्ष्य’ या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. जयकिशन महाराज यांचे शिष्य विश्वदीप शर्मा, जया भट यांनी कोणत्याही तालात सम गाठणे हे लक्ष्य असले पाहिजे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक