चणकापूर झाडी एरंडगाव कालव्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:25 IST2019-02-07T16:25:23+5:302019-02-07T16:25:41+5:30
देवळा तालुका : सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर

चणकापूर झाडी एरंडगाव कालव्याच्या कामास प्रारंभ
उमराणे : गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चीत आणि देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनतेसाठी स्वप्नवत बनलेल्या चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
चणकापुर धरणाचे पाणी झाडी धरणात टाकण्यात यावे यासाठी दोन महिन्यापूर्वी देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनता आक्र मक बनली होती. शिवाय जोपर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना गावबंदींचा ठरावही बहुतांशी गावांनी केल्याने लोकप्रतीनिधींची पंचाईत झाली होती. परंतु त्याआधीच कालव्याचे उर्वरित काम व वहनक्षमता याविषयी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा झाल्यानंतर या कामास मंजुरी मिळाली होती. कालव्याच्या ३२ ते ३५ या तिन कि.मी.कामास सहा कोटी रु पये निधी मंजुर होऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव ,देवानंद वाघ, कान्हू जाधव, राजू जाधव, दत्तू आहेर, संदिप जाधव, माधव आहेर, महेंद्र पाटील,दिपक निकम आदिंसह तिसगाव, झाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.