शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:37 AM

 जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत.

नाशिक :  जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत.जिल्ह्यातील पहिल्या टप्प्याच्या निर्धारित लसीकरणाच्या तुलनेत ९० टक्क्यांच्या आसपास लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी या लसी दाखल झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने कोविशिल्डच्या लसींचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या टप्प्यात आलेली लस ही कोव्हॅक्सिनचीच आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा लस घेणाऱ्या व्यक्तींना त्याच कोविशिल्डच्या लसी दिल्या जाणार आहेत. मात्र, नवीन लस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सिनच्या लसी देण्यात येत आहेत. लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस, विविध क्षेत्रांतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देणार आहेत.तालुकास्तरावर वितरणजिल्हा रुग्णालयातील लस साठवणूक दालनातील वॉक इन कुलरमध्ये सुमारे ५ डिग्री सेंटिग्रेडला या लसी मोठ्या बॉक्सेसमध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत. त्या लसींचे तापमान कायमस्वरूपी २ ते ८ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य केंद्रांमध्ये व्हॅनमधून नेतानाही त्या लसी आइसलँड रेफ्रीजरेटरमधून (आयएलआर) नेण्यात आल्या असून जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रांपर्यंत त्या पोहोचविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस