नाशकात रिमझिम पावसाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:16 IST2018-06-25T11:15:46+5:302018-06-25T11:16:05+5:30

Start of rainy season | नाशकात रिमझिम पावसाला प्रारंभ

नाशकात रिमझिम पावसाला प्रारंभ

नाशिक- रविवारी मध्यरात्रीपासून शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली असून नाशिककर सुखावले आहेत. रविवारी (दि.२४) दिवसभर ढग जमले तरी पावसाचा पत्ता नव्हता. मात्र मध्यरात्रीपासून पावसाला दमदार सुरवात झाली. नाशिककरांचा सोमवार सुखद अशा पावसाने सुरु झाला. सकाळपासून शहरात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. नागरिकांची त्यामुळे धावपळ होत असली तरी दिर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर आता त्याचे आगमन झाल्याने समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. पहाटपासून पाऊस पडत असल्याने सुर्यदर्शन उशिरा झाले. दिवसभर वातावरणात गारवा भरुन होता. कपाटात ठेवून दिलेल्या छत्री, रेनकोट बाहेर काढून नागरिक आता त्याचा वापर आवर्जुन करताना दिसत आहे. पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचले असले पावसाला फारसा जोर नसल्याने धोकादायक चित्र नाही.
 

Web Title: Start of rainy season