नाशिक : बहुप्रतीक्षित असलेल्या विमानसेवेला अखेर सुरुवात झाली असून, केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून मुंबईहून नाशिकला आलेल्या एअर डेक्कनच्या विमानाने शनिवारी (दि.२३) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. पहिल्याच दिवशी १५ प्रवाशांनी नाशिक - पुणे प्रवासासाठी या विमानसेवेचा लाभ घेतला. यातील स्नेहा जो यांना एका रुपयात प्रवासाची संधी मिळाली, तर मनोज राय हे या विमानसेवेचे प्रथम प्रवासी म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना बोर्डिंग पास देऊन पुण्याकडे रवाना करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुंबईहून नाशिकला आलेल्या विमानाचे आगमन झाल्यानंतर विमानतळावर दीपप्रज्वलन करून सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एअर डेक्कनचे अध्यक्ष गोपीनाथ, सीएमडी सुवर्ण राजू, सिव्हिल एव्हीएशनचे राजू चौबे, एचएलचे सचिव आर.एन. चौबे आदी उपस्थित होते. त्यांचे खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,आमदार बाळासाहेब सानप यांनी विमानतळावर स्वागत केले. मुंबई-नाशिक व नाशिक-पुणे या दोन विमानसेवा आजपासून सुरू झाल्या असून, एअर डेक्कनतर्र्फे ही सेवा सुरु करण्यात आली आहे. एअर डेक्कनच्या १९ सीटर विमानातून ४० मिनिटांच्या हवाई प्रवासासाठी पहिल्या नऊ प्रवाशांना उडान योजनेच्या सबसीडीसह १४०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर अन्य प्रवाशांना कंपनीच्या तिकिटाप्रमाणे प्रवास करावा लागणार आहे. काही नशीबवान प्रवाशांना या विमानाने फक्त एक रु पयात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. नांदेड- अमृतसर सेवेस प्रारंभनांदेड व अमृतसर या ऐतिहासिक शहरांना शनिवारी एअर इंडियाच्या विमानसेवेने जोडण्यात आले. अमृतसर येथून निघालेले विमान दुपारी दीडच्या सुमारास उतरले. परतीच्या प्रवासात नांदेड येथून ८० प्रवासी रवाना झाले. सव्वादोन तासांत हा प्रवास होणार आहे.
नाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा : पालकमंत्र्यांच्या आगमनाने विमानसेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:07 IST
नाशिक : बहुप्रतीक्षित असलेल्या विमानसेवेला अखेर सुरुवात झाली असून, केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून मुंबईहून नाशिकला आलेल्या एअर डेक्कनच्या विमानाने शनिवारी (दि.२३) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. पहिल्याच दिवशी १५ प्रवाशांनी नाशिक - पुणे प्रवासासाठी या विमानसेवेचा लाभ घेतला. यातील स्नेहा जो यांना एका रुपयात प्रवासाची संधी मिळाली, तर मनोज राय हे या विमानसेवेचे प्रथम प्रवासी म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना बोर्डिंग पास देऊन पुण्याकडे रवाना करण्यात आले.
नाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा : पालकमंत्र्यांच्या आगमनाने विमानसेवेचा शुभारंभ
ठळक मुद्देनाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा विमानतळावर दीपप्रज्वलन करून सेवेचे औपचारिक उद्घाटन