एसएमआरकेमध्ये ‘सृजनोत्सवास’ प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:48 IST2019-12-13T23:44:38+5:302019-12-14T00:48:26+5:30
श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात ‘सृजन’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘क्वालिटी इन एव्हरी अॅक्टिव्हिटी’ अशी प्रदर्शनाची संकल्पना ठरविण्यात आली आहे.

एसएमआरके महाविद्यालयात सृजनोत्सव उपक्रमात शैक्षणिक प्रदर्शनाची पाहणी करताना एस. पी. बडगुजर, उपप्राचार्य साधना देशमुख, डॉ. नीलम बोकील, शुभदा देशपांडे आदी
नाशिक : श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात ‘सृजन’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘क्वालिटी इन एव्हरी अॅक्टिव्हिटी’ अशी प्रदर्शनाची संकल्पना ठरविण्यात आली आहे.
प्रदर्शनात विद्यार्थिनींनी विषयाला अनुसरून नवनवीन वर्किंग मॉडेल्स स्वत: तयार केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, स्वत:चा विकास आणि समाजाचा विकास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सृजनसारख्या उपक्रमातून उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढीस लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नातं अधिक दृढ होते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, साधना देशमुख, डॉ. नीलम बोकील, शुभदा देशपांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रसिका सप्रे यांनी केले.
महोत्सवात विविध उपक्रम
सृजन महोत्सवात १६ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयाचे आकर्षण ठरणारी मिस एसएमआरके व्यक्तिमत्व स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा १८ रोजी सकाळी ९ वाजता प. सा. नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे, तर १९ ते २१ दरम्यान महाविद्यालयामध्ये मेहंदी, रांगोळी, एकपात्री अभिनय, मिमिक्री, एसएमआके जीनीयस, शेफ आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.