चांदवड बाजार समितीत लाल कांद्याच्या खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 17:38 IST2018-10-18T17:37:29+5:302018-10-18T17:38:02+5:30
चांदवड बाजार समितीच्या आवारात कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु असून लाल कांद्याच्या खरेदीस प्रारंभ झाल्याने कांदा उत्पादकात समाधान व्यक्त होत आहे.

चांदवड बाजार समितीत लाल कांद्याच्या खरेदीस प्रारंभ
येथील बाजार समितीत आॅक्टोबर महिन्यापासून नविन लाल कांद्याची आवक येण्यास सुरु वात झाली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाल कांद्याचा लिलाव शुभारंभ करण्यात आला आहे. मुहूर्ताच्यावेळी लाल कांद्यास जास्तीत जास्त २५०१ रु पये तर सरासरी भाव २००० रूपयांपर्यंत होते. चांदवड येथे कांदा विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात येत असल्याने शेतकºयांनी आपला कांदा प्रतवारी करुन विक्रीस आणावा असे आवाहन समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केले आहे.