टपरीधारकांचे अधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:50 PM2018-07-19T22:50:51+5:302018-07-20T00:17:58+5:30

नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा भागात बुधवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर भाजपा संलग्न नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

The stake holder officers | टपरीधारकांचे अधिकाऱ्यांना साकडे

टपरीधारकांचे अधिकाऱ्यांना साकडे

googlenewsNext

नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली.
नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा भागात बुधवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर भाजपा संलग्न नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्टÑीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्यवसाय होईल अशा ठिकाणी हॉकर्स झोन समितीच्या माध्यमातून स्थापन करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिकरोड भागातील विक्रेत्यांना आगाऊ सूचना किंवा माहिती न देता त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करून त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम मनपा प्रशासन करत आहे. शिवाजी पुतळा, आंबेडकररोड परिसर बाजारपेठ असल्याने त्याच ठिकाणी हॉकर्सना व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळामध्ये सय्यद युनूस, नवनाथ ढगे, माणिकराव चव्हाण, राजेंद्र शर्मा, महेंद्र आहिरे, दत्ता वावधने, संतोष खिल्लारे, संजय पाटील, खलील मनियार, अल्ताफ शेख, संपत सानक, सागर गवळी, दीपक गोसावी, महेंद्र भोर आदी सहभागी झाले होते.
अतिक्रमण विरोधी कारवाईस विरोध
पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये, असा शासनाचा जीआर असताना मनपा चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. हॉकर्स झोन पूर्णपणे स्थापन करून दिल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांसोबत बैठक घडवून आणावी, अशी मागणीदेखील केली.

Web Title: The stake holder officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.