शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या २६ कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या; अनेकांवर कारवाईची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:41 IST

नाशिक - कामावर परतण्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय देऊनही संपावरील एसटी कर्मचारी कामावर परतले नसल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू ...

नाशिक - कामावर परतण्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय देऊनही संपावरील एसटी कर्मचारी कामावर परतले नसल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत २६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने त्यांची सेवा संपुष्टात आली असून, एसटीतील सेवेचा मार्ग बंद झाला आहे. आणखी १७० जणांना नोटिसा बजाविण्यात आल्याने त्यांच्यावरही बडतर्फीची टांगती तलवार आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ६८ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एकीककडे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना बोलविण्याचे सुरू असलेले प्रयत्न, तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना महामंडळाच्या स्थानिक विभागाकडून कारवाईदेखील सुरू होती. या काळात जिल्ह्यातील ४४९ कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी १७ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले, तर शुक्रवारी नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले हेाते.

या कर्मचाऱ्यांना आता महामंडळाचे दरवाजे बंद झाले आहेत. निलंबित करण्यात आलेल्यापैकी आणखी १७० जणांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. बडतर्फ करण्यापूर्वीची ही नोटीस असून, या कर्मचाऱ्यांवरदेखील पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारवाईची टांगती तलवार असली तरी कर्मचाऱ्यांनी मात्र संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.

रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांंना अभय

बडतर्फीची कारवाई करण्यापूर्वी कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय दिले जाणार असल्याचे संकेत एसटी महामंडळाकडून दिले जात आहे. कामावर हजर होण्याची इच्छा असलेल्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना कामावर रुजू करून घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNashikनाशिक