शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कर्कश आवाज, धुळीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:44 PM

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे नागपूर - मुंबई महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर माती, मुरूम आणि इतर साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे लोट उडत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही मुश्कील झाले आहे.

ठळक मुद्देखंबाळे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे रस्त्यांची दुर्दशा

लोकमत न्यूज नेटवर्कखंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे नागपूर - मुंबई महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर माती, मुरूम आणि इतर साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे लोट उडत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही मुश्कील झाले आहे.खासगी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यातून माती, मुरूम काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बिरोबावाडी येथे सुरू आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवसभर या गाड्यांची वाहतूक सुरू असल्याने उडणारी धूळ आणि आवाज यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करावी लागत आहे. धुळीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्याची तक्रार पालकांनी केली आहे.रस्त्याने चालताना वाहनातील गाण्यांचा कर्कश आवाज आणि सुसाट वेगाने धावणारी वाहने यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. धुळीपासून मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. महामार्ग व्यवस्थापकांना वेळोवेळी लेखी आणि तोंडी माहिती देऊनदेखील संबंधित अधिकारी याकडे काणाडोळा करीत असल्याची तक्रार आहे. रस्त्यावर काम करणाºया संबंधित निरीक्षक व कर्मचारी हे अरेरावीची भाषा करून दमबाजी करीत आहेत.खंबाळे, रामोशी वस्ती ते दातली रस्त्यावर पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी उंची वीस ते पंचवीस फूट असून, येण्या-जाण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. शेतकºयांना शेतातील माल काढण्यासाठी आठ ते दहा किलोमीटर फिरून यावे लागते. रस्त्यासाठी संपादन सुरू केले तेव्हा तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी शेतकºयांना आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांना महामार्गाचे कर्मचारी पायदळी तुडवित आहेत. गाड्यांच्या धुळीमुळे सर्व पिके खराब झाली आहेत. संबंधितांनी सदर पिकांचे पंचनामे करावेत आणि जिल्हा परिषद शाळेजवळील गाड्यांच्या वाहतुकीला पर्याय काढावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती गोफणे, पांडुरंग नागरे, अण्णा खाडे, उत्तम आंधळे, शैलेश आंधळे, शिवाजी खाडे, गणेश नागरे आदींसह शेतकरी आणि पालकांनी केली आहे.नवा रस्ता उखडला...महामार्गासाठी लागणारी माती भोकणी, दातली, खोपडी, धारणगाव येथील बंधाºयाचा गाळ काढला तसेच देवनदीचा गाळ मोठ्या प्रमाणात काढला व त्याची वाहतूक सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून सुरू आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खंबाळे ते माळवाडी रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यांपूर्वी नव्याने झाले होते. आज हा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा