मालेगावी "क्रीडा भारती" तर्फे क्रीडा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 23:04 IST2021-08-29T23:00:27+5:302021-08-29T23:04:51+5:30

मालेगाव : येथील क्रीडा भारतीच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

Sports Day celebrated by Malegaon Hykrida Bharatihna | मालेगावी "क्रीडा भारती" तर्फे क्रीडा दिन साजरा

मालेगावी "क्रीडा भारती" तर्फे क्रीडा दिन साजरा

ठळक मुद्देसॅम क्लबच्या खेळाडूंनी कबड्डीचे प्रात्यक्षिक सादर केले.

मालेगाव : येथील क्रीडा भारतीच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

प्रारंभी क्रीडा भारतीचे प्रांत उपाध्यक्ष नितीन पोफळे, जिल्ह्याध्यक्ष भानू कुलकर्णी, प्रांत कार्यकारिणी सदस्य तुकाराम मांडवडे, गीतेश बाविस्कर, मनोहर बहिरम, नम्रता पोफळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मांडवडे यांनी ह्यखेल खिलाडी खेलह्ण या गीताने सुरुवात केली. सॅम क्लबच्या खेळाडूंनी कबड्डीचे प्रात्यक्षिक सादर केले.

सोहम योगा ॲकडमीच्या विद्यार्थ्यांनी योगांचे नयनरम्य प्रात्यक्षिक सादर केले. प्रांत उपाध्यक्ष पोफळे तसेच भानु कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सॅम क्लबचे प्रशिक्षक प्रवीण चांगरे व सोहम योगा ॲकडमीच्या योगप्रशिक्षक साक्षी शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा मंत्री गीतेश बाविस्कर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
यावेळी हरीष ब्राह्मणकर, अभिजित जाधव, दीपक पाटील, रवीराज सोनार, चेतन बाविस्कर,चेतन वाघ, सुनील वाघ, रोहित कदम, महेश्वरी खैरनार उपस्थित होते.

Web Title: Sports Day celebrated by Malegaon Hykrida Bharatihna