गुलाब पुष्प प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:59 IST2020-01-24T16:56:51+5:302020-01-24T16:59:57+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे.

गुलाब पुष्प प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
नाशिक : तीन वर्षापासून नाशिक्लबतर्फे पुष्प प्रदर्शन भरविण्यात येत असून, यावर्षीही नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे शुक्रवार (दि.२४) पासून तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे.
देशभरातून विविध रंग व पाचशे प्रकारातील गुलाब पुष्प व विविध प्रकारचे ३० पेक्षा अधिक प्रकारची फुलझाडांचे पुष्प रसिकांनी गर्दी केली होती. प्रदर्शनास विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन फुलांविषयी माहिती जाणून घेतली. फुलांबरोबरच पुष्प प्रेमी नाशिककर गुलाबपुष्पाने सजवलेल्या ‘रोज डॉल’, पुष्पाने सजवलेली मलेशियन पोपटांची जोडी व कल्पकतेने बनवलेल्या ‘क्रि समस ट्री’ या बरोबर देखील सेल्फीचा आनंद घेत होते. यावर्षी नाशिक तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी देखील गुलाब प्रदर्शनात भेट देऊन शेती संबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांचा कल नवीन पारंपारिक शेती पासून काही नवीन करण्याकडे आहे हे जाणवले. प्रदर्शनाचे उदघाटन उद्योजक देवकिसन सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिगेडिअर अनिलकुमार गर्ग, अभिनेते डॉ. राजेश आहेर, नाना शेवाळे , नेमीचंद पोतदार आदी उपस्थित होते.