Spontaneous response to the inter-school lecture competition | आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देदेवळाली हायस्कूल प्रथम : द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हायस्कूल; पारितोषिक वितरण

देवळाली कॅम्प : देवळाली रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेतील स्पर्धेमध्ये देवळाली हायस्कूल अव्वल ठरली, तर द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हास्यकूल राहिली.
येथील डॉ. गुजर शाळेच्या सभागृहात आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मराठी विभागात मराठी खाद्य संस्कृती, कुटुंबव्यवस्था एकत्र की विभक्त, इंटरनेट-ज्ञानाचे भांडार, हिंदी विभागात सडक सुरक्षा, तर इंग्रजी विभागात रेन वॉटर हार्वेस्टिंग नीड, रोटरी कनेक्ट द पीपल, से नो प्लॅस्टिक आदी विषयावर देवळाली हायस्कूल, सेंट पॅट्रिक्स स्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड हास्यकूल, आदर्श शिशु विहार, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, वासुदेव अथनी इंग्रजी माध्यम स्कूल, नूतन विद्यामंदिर आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी मुख्याध्यापक हसानंद नेहलानी, इनरव्हील अध्यक्ष भैरवी बक्षी, श्रुती मदान, राजू कटारे, बोधराज वर्मा यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन संयोजक सेवानिवृत्त कर्नल अशोक शिरगावकर, तर आभार डॉ. अरु ण स्वादी यांनी मानले. याप्रसंगी रोटरी व इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच पालक उपस्थित होते.
विजेते स्पर्धक
मराठी विभाग-प्रथम-समिक्षा निसाळ, द्वितीय- समीक्षा जगताप, तृतीय-आदित्य रंधे.
४ हिंदी विभाग-प्रथम-रिषीत कायस्थ, द्वितीय-लोचना मुठाळ, तृतीय-मानसी भट्टर.
४ इंग्रजी विभाग-प्रथम-अरमान सिंग, द्वितीय-अंजली ढोब्रियाल, तृतीय-गायत्री पाळदे.
४ उत्तेजनार्थ : साक्षी बोराडे, दिशा मेवानी, अलिशा मणियार, श्रेया मोजाड, अंकिता करंजकर, आजमीन खान, ईशा मनवानी, प्रज्वल कोठारी.


Web Title: Spontaneous response to the inter-school lecture competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.