शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:15 IST

६१वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्ध स्मारकाचा वर्धापन दिन पांडवलेणीलगत असलेल्या बौद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, महानगरपालिका व सम्राट सोशल ग्रुप पाथर्डीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.

पाथर्डी फाटा : ६१वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्ध स्मारकाचा वर्धापन दिन पांडवलेणीलगत असलेल्या बौद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, महानगरपालिका व सम्राट सोशल ग्रुप पाथर्डीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमांची सुरुवात महापौर रंजना भानसी व आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर बौद्धस्तुपातील भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरांनी बुद्धवंदना समर्पित केली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे, विधी समिती उपसभापती राकेश दोंदे, भाजपा गटनेते संभाजी मोरु स्कर, नगरसेवक दीक्षा लोंढे, कविता कर्डक, एकनाथ नवले, संजय नवले, पोलीस उपायुक्त श्रीकांत कोकाटे, सचिन गोरे आदी मान्यवर उपस्थित होते, भन्ते सुगत यांनी उपस्थितांचे स्वागत करून धम्मवंदना सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मनपा व बिटको हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बँक आॅफ महाराष्ट्र, एससी, एसटी अँड ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशन मनपा व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि सम्राट सोशल ग्रुप यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा आयोजित नाशिकरोड येथील श्रामणेर शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत येथे करण्यात आला.पावसातही दांडगा उत्साहदुपारच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस कोसळल्याने नागरिक व व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. व्यावसायिकांचे मंडप वाºयाने उडून गेले तर अनेकांच्या वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. पावसानंतरही भाविकांची गर्दी स्मारकाकडे येऊ लागल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले. दुपारनंतरच्या सत्रात शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जाहीर धम्मसभेवरही पावसामुळे परिणाम झाला असला तरी भाविकांनी उभे राहून विचार ऐकले. यावेळी उपस्थित भाविकांना वाबीस प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा देण्यात आली. परिसरात अनेक संस्था संघटनांनी मंडप उभारून अन्नदान, प्रबोधनाचे कार्यक्र म घेतले. प्रथमच येथे वधूवर सूचक मंडळांचेही स्टॉल लागलेले पाहायला मिळाले.