शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पाईक’ श्वानाला मिळाले हक्काचे कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:17 IST

लॅब्रोडोर जातीचा शांत स्वभावाचा मात्र स्फोटकसदृश वस्तूंचा शोध घेण्यात तितकाच तरबेज असलेला स्पाईक तीन महिन्यांचा असताना बॉम्ब शोधक-नाशक पथकात ...

लॅब्रोडोर जातीचा शांत स्वभावाचा मात्र स्फोटकसदृश वस्तूंचा शोध घेण्यात तितकाच तरबेज असलेला स्पाईक तीन महिन्यांचा असताना बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झाला. या श्वानाची तेव्हापासून हिरे यांनीच काळजी घेत संगोपन केले. त्याचा वेळोवेळी सराव करून घेणे, औषधोपचार, खाद्यपुरवठा आदी बाबींची बारकाईने खबरदारी घेत स्पाईकची निगा राखली. शहरात पार पडलेला सिंहस्थ कुंभमेळा असो किंवा अलीकडेच राष्ट्रपती, पंतप्रधान यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांप्रसंगीसुध्दा आपली भूमिका स्पाईक श्वानाने चोखपणे बजावली. हे श्वान अत्यंत कष्टाळू आणि आज्ञाधारी असल्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले. याच्या सेवानिवृत्तीमुळे आता बीडीडीएस पथकाकडे केवळ ‘लकी’ हे एकमेव श्वान राहिले असून लवकरच दुसऱ्या श्वानाचे आगमन पथकात होणार असल्याचे ते म्हणाले.

---इन्फो--

...अन‌् कुटुंब झाले हर्षोल्हासित

हिरे यांच्याकडून नेहमीच स्पाईकच्या कामगिरीचे कौतुक त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या कानी पडत असे. स्पाईकचे कर्तब सातत्याने ऐकल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही कुतूहल वाटत होते. ११ वर्षांची सेवा बजावल्यानंतर कुटुंबात आलेल्या या नव्या सदस्याचे सर्वांनीच जोरदार स्वागत केले. घरात फुगे लावून सजावट करण्यात आली होती. तसेच सुवासिनींकडून त्याचे औंक्षणही करण्यात आले आणि घरातील युवा मंडळींनी केकचा बंदोबस्त केला होता. ‘वेलकम स्पाईक’ म्हणत घरातील सदस्यांनी एकच जल्लोष केला.

---कोट--

दहा वर्षांपासून पोलीस नाईक गणेश हिरे यांनीच स्पाईकची देखरेख केली. दोघांना एकमेकांचा लळा लागला. हिरे हे श्वानप्रेमी असून ते श्वानांना प्रशिक्षणाचे धडेही देतात. यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये स्पाईकची पुढील संगोपनाची जबाबदारीही हिरे यांच्यावरच सोपविण्यात आली.

- विजय शिंदे, पोलीस निरिक्षक, बीडीडीएस- (फोटो आर वर २४विजय नावाने)-

--

२४डॉग/२४डॉग१ नावाने फोटो आर वर :

कॅप्शन : कुटुंबात दाखल झालेल्या स्पाईक या नव्या सदस्याचे केक कापून स्वागत करताना पोलीस नाईक गणेश हिरे. समवेत कुटुंबीय.

===Photopath===

240221\24nsk_42_24022021_13.jpg

===Caption===

नव्या स्पाईक या नव्या कौटुंबिक सदस्याचे स्वागत