अहमदनगर जिल्ह्यातून हरविलेल्या गतिमंद महिलेला केले मुलाच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:35 IST2019-10-11T23:17:15+5:302019-10-12T00:35:35+5:30
अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले. गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिला चहापान देऊन चौकशी केली. ती गतिमंद असल्याचे प्रारंभीच त्यांच्या लक्षात आले.

गतिमंद शारदा शिवाजी सांबरे या वृद्ध महिलेस तिचा मुलगा संतोष सांबरे यांच्याकडे सोपविताना पोलीस नाईक आर. एस. घुमरे, महिला पोलीस टी.सी. शेख, एन. जे. तेलंगे, होमगार्ड बाविस्कर, शब्बीर खाटीक.
ओझर टाउनशिप : अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले.
गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिला चहापान देऊन चौकशी केली. ती गतिमंद असल्याचे प्रारंभीच त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओझर पोलिसांशी संपर्क साधून तिला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सदर महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिचे नाव शारदा शिवाजी सांबरे असून, ती वंजारवाडी, ता. अहमदनगर, जि. अहमदनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. नगर पोलीस ठाण्याशी संपर्ककरून हरविलेल्या शारदा सांबरे यांचा मुलगा संतोष शिवाजी सांबरे याचा शोध घेऊन पोलिसांनी फोन नंबरही मिळविला व त्यास खात्री करून दिली. संतोष सांबरे यास ओझर येथे बोलावून घेतले व योग्य ती समज देत हरविलेल्या शारदा सांबरे यांना त्याच्या हवाली करून मातृसेवेचा सल्ला दिला.