शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:25 AM

नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.

ठळक मुद्देडीपीआरसाठी बैठक डिसेंबरपर्यंत अहवाल सादर

नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.नाशिककर हक्काच्या पाण्याबाबत जागृक झाल्यानंतर दमणगंगा तसेच नार-पार प्रकल्पांचे पाणी नाशिकला वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्या दरम्यान पेठ तालुक्यात एकदरे धरणाचा विषय पुढे आला. खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे राजेंद्र जाधव यांनी शासनाकडे याबाबत व्यवहार्य भूमिका मांडली होती. त्यातून दमणगंगा एकदरे लिंक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. दमणगंगा नदीवर पेठ तालुक्यातील एकदरे पाच हजार दक्षलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. आठ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे २१० मीटर उपसा करून उमरद गावाजवळ खिरा डोंगरावर हे पाणी आणण्यात येणार आहे. तेथून ५.५ किलो मीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात हे पाणी आणण्यात येणार आहे. त्यमाुळे पिण्यास, उद्योगास आणि सिंचनास पाणी उपलब्ध होणार असून त्यास तत्त्वत: मान्यता मिळल्यानंतर राष्टÑीय जलविकास अभिकरणाला विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम देण्यात आले आहे. या अभिकरणाचे हैदराबाद येथील मुख्य अभियंता एन. श्रीनिवासन, कार्यकारी अभियंता डी. के. शर्मा यांनी नाशिकमध्ये भेट दिली तसेच सिंचन भवनमध्ये बैठक घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता मोरे जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपलब्ध धरणे तसेच प्रस्तावित धरणे याचा विचार करून कमीत कमी भूसंपादन त्यामुळे कमीत कमी पुनर्वसन करतानाच प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. मार्च महिन्यापर्यंत सदरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधी असला तरी डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले.राष्टÑीय नद्याजोड प्रकल्पाअंतर्गत एकदरे आणि सिन्नर गारगोई-वैतरणा- कडवा-देवनदी लिंक प्रकल्पासह एकूण चार प्रकल्पांचा समावेश करण्याचे आश्वासन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. एकदरे प्रकल्प झाल्यास नाशिक शहरासाठी २५०० दशलक्षघनफूट, तर सिंचनासाठी दीड हजार दशलक्षघनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. केवळ पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोरिडोअर नाशिकमधून स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु आता या पाण्यामुळे दुसºया टप्प्यातील नाशिकचा समावेश निश्चित झाला आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सौरऊर्जेवर पाण्याचा उपसाएकदरे प्रकल्पासाठी ३२ तसेच सिन्नर तालुक्यातील गारगोई-वैतरणा-कडवा- देव नदी लिंक प्रकल्पात पाणी उपसा करण्यासाठी ३५ मेगावॉट वीज लागणार आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सौरऊर्जेवर पाण्याचा उपसा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे.