मातीचे बैल तयार करण्यास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 11:54 IST2018-09-03T11:53:27+5:302018-09-03T11:54:21+5:30
माती पासून बैल बनवणे, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बैल बनविणे पारंपरिक व्यवसायांमध्ये आनंद

मातीचे बैल तयार करण्यास वेग
नाशिक/विल्होळी : विल्होळी व परिसरातील गावांमध्ये मातीचे व पीओपीचे बैल तयार करण्यास व रंगरंगोटीचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येते. विल्होळी व परिसरातील अनेक वीटभट्टी व्यवसाय असून पावसामध्ये वीट भट्टी काम बंद असल्याने सगळे बांधव माती पासून बैल बनवणे, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बैल बनविणे पारंपरिक व्यवसायांमध्ये आनंद घेतात, या कामांमध्ये परिवारातील लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. सध्याच्या परिस्थितीत शेतीसाठी लागणारे नवनवीन अवजारे तसेच अनेक ट्रॅक्टर बाजारात आले असल्याने बैलांची संख्या कमी झाली. त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी पूजेसाठी मातीच्या बैलांचा वापर करावा लागतो. त्यामुळे बैल कामात जोरदार पद्धतीने सुरु वात झालेली दिसून आली.