शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक

By admin | Updated: April 5, 2017 00:55 IST

हेल्पलाइनचीही सुरुवात : पालकमंत्र्यांनी केले वाहनाचे उद्घाटन

नाशिक : शहरात पर्यटनासाठी देश-विदेशांतून येणाऱ्या पर्यटकांची आपत्कालीन घटना, समस्यांतून मुक्तता करण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांनी ‘पर्यटक पोलीस पथका’ची स्थापना केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर काळाराम मंदिरासमोर या पथकाच्या वाहनाचे उद््घाटन करण्यात आले. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या सहकार्याने ‘नाशिक पोलीस पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या पथकाच्या शुभारंभप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, पर्यटक पोलीस पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. अहिरराव व सी. एस. पाटील नगरसेवक शशिकांत जाधव आदि उपस्थित होते. अनेकदा पर्यटकांची लूट, गैरसोय, पर्यटकांकडून नियमबाह्य भाडे आकारणे, त्यातून उद््भवणारे वादाचे प्रकार अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पथक काम करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने यावेळी नाशिक पर्यटनाची माहिती देणाऱ्या पुस्तिका व पत्रकांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)