सोयगावी तरुणावर धारदार शस्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:12 IST2020-08-24T22:14:26+5:302020-08-25T01:12:09+5:30
मालेगाव : तुला कोरोना झाला होता, तू माझ्याजवळ उभा राहू नको, अशी कुरापत काढून भांडण करून सोयगाव येथील अजिंक्य धनंजय ऊर्फ बाळासाहेब बच्छाव, रा. शिवाजी पुतळा गल्ली याने धारदार शस्राने यशवर्धन भास्कर बच्छाव (२४) या तरुणाच्या पोटावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सोयगावी तरुणावर धारदार शस्राने हल्ला
ठळक मुद्देजखमी यशवर्धन याचेवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू
मालेगाव : तुला कोरोना झाला होता, तू माझ्याजवळ उभा राहू नको, अशी कुरापत काढून भांडण करून सोयगाव येथील अजिंक्य धनंजय ऊर्फ बाळासाहेब बच्छाव, रा. शिवाजी पुतळा गल्ली याने धारदार शस्राने यशवर्धन भास्कर बच्छाव (२४) या तरुणाच्या पोटावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कॅम्प पोलिसात फिर्याद देण्यात आली. जखमी यशवर्धन याचेवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळा गल्ली, सोयगाव येथे ही घटना घडली. जखमी तरुणाचे वडील भास्कर बच्छाव यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.