शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:51 AM

बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग: ७२० क्विंटल डाळ दोन दिवसांत पोहोचणार

नाशिक : बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.तूरडाळींच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तूरडाळ खरेदी करणे अशक्य झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनद्वारे सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ खरेदी करता यावी यासाठी शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात पुरवठा विभागाला सदर डाळ प्राप्त होणार असून, रेशन दुकानांमधून तूरडाळ ५५ रु पये प्रतिकिलो दराने दिली जाणार आहे. ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दराने डाळ मिळावी यासाठी रेशनदुकानारांना डाळीची मागणी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे कडधान्यांचे नुकसान झाले. काढणीची पिकेही वाहून गेली. याचा फटका डाळींच्या पुरवठ्यावर झाल्यामुळे नवीन डाळ बाजारात येऊ शकली नाही त्यामुळे बाजारपेठेत डाळीचा तुटवडा निर्माण झाला.मराठवाडा व विदर्भात कडधान्याची पिके घेतली जातात, परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तेथून येणारी डाळही वेळेत येऊ शकली नाही. राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र, यंदा सर्वत्र कडधान्याचे क्षेत्र घटल्यामुळे डाळींचा भाव वधारला आहे. दुकानांमध्ये उडीद १२०, तर मूगडाळ ११० रु पये किलो दराने विक्र ी केली जात आहे. दुसरीकडे या डाळींना मागणी वाढली असून, पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरबरा डाळ, उडीद, मूग आदींच्या किमतीनी प्रति किलो शंभरी पार केली आहे. डाळीच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांना डाळ खरेदी करणे मुश्किल झाले आहे. याचमुळे कार्डधारकांना वाजवी दरात तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात ही मागणी करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत तूरडाळ डाळ प्राप्त होणार आहे.तूरडाळीला उठाव नसल्यामुळे रेशनदुकानदारांकडून तूरडाळीची मागणी नोंदविली जात नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असताना दुसरीकडे ग्राहक मात्र तुरडाळ मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत, तर मागणी नोंदवूनही तूरडाळ प्राप्त होत नसल्याचे रेशनदुकानदारंचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळीपासून तूरडाळीचा पुरवठा अनिश्चित झाला आहे. आता घाऊक बाजारात तुरडाळींचे भाव शंभरच्या पुढे गेल्याने आता रेशनदुकानातून तूरडाळ प्राप्त होणार आहे. यासाठी पुरवठा विभाग गंभीर असून, रेशनदुकानदारांच्या मागणीकडे लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार