सोनसाखळी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:38 IST2018-11-15T23:59:58+5:302018-11-16T00:38:09+5:30

देवळाली कॅम्प येथील चैनस्नॅचिंग करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

Sonasakhi thieves arrested | सोनसाखळी चोरट्यास अटक

सोनसाखळी चोरट्यास अटक

नाशिकरोड : देवळाली कॅम्प येथील चैनस्नॅचिंग करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी चैनस्नॅचिंग संशयिताचा शोध घेत होते. नाशिकरोड गुन्हे शोध पथकातील गुन्हे कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना देवळाली कॅम्पमधील संशयित युवकाने काही दिवसांपूर्वी चैनस्नॅचिंग केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशाल पाटील, सूर्यवंशी, पवार, कुवर, वाणी यांनी विजय-ममता परिसरात सापळा रचून संशयित अक्षय क्षत्रिय (२४) रा. देवळाली कॅम्प यास ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित अक्षय क्षत्रिय याची कसून चौकशी केली असता बोधलेनगर येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून नेल्याची कबुली दिली.

Web Title: Sonasakhi thieves arrested