शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

सतरा ब्लॅक स्पॉटवर करणार उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:26 AM

बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़

नाशिक : बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़ अपघातांच्या या ब्लॅक स्पॉटवर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शहर वाहतूक शाखेकडून अभ्यास सुरू आहे़ या अभ्यासातील निष्कर्षानुसार अपघात कसे कमी करता येतील, यासाठी वाहतूक शाखेमार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत़नाशिक शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर मुख्य रस्त्यांवर सुमारे पाचशे मीटर (पाचशे मीटर अपघात प्रवणक्षेत्र) अंतरामध्ये मागील सलग तीन वर्षांच्या कालावधीत एकूण पाच प्राणांकित अपघात किंवा गंभीर अपघात किंवा सलग तीन वर्षांत एकूण दहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असतील असे ठिकाण ब्लॅक स्पॉट (तीव्र अपघात वळण स्थळ) म्हणून ठरविले जाते़  नाशिक शहरात वेगमर्यादेचे उल्लंघनामुळे सर्वाधिक तर त्याखालोखाल चौफुल्यांवर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे़ या अपघातांमध्ये दुचाकी अपघात व त्यामध्ये प्राण गमावणाºयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ दुचाकीवरील बहुतांशी अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू हा हेल्मेट परिधान न केल्याने झालेला आहे़  दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केले असते तर त्यांचा जीव निश्चित वाचू शकला असता़ मात्र, हेल्मेटकडे दुचाकीस्वारांकडून ओझे म्हणून केले जाणारे दुर्लक्षच जिवावर बेतल्याचे समोर आले़ त्यामुळे वाहतूक शाखेमार्फत विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत़शहरातील असे आहेत ब्लॅक स्पॉटआजमितीस शहरातील पंचवटी-तपोवन क्रॉसिंग, आडगाव-स्वामीनारायण चौफुली, क़ का़ वाघमहाविद्यालय, बळीमंदिर रासबिहारी चौफुली, नांदूर नाका सिग्नल, मिरची हॉटेल सिग्नल नाशिकरोड-चाडेगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, शिंदेगाव, उपनगर - फेम सिग्नल, पंचवटी - तारवालानगर सिग्नल, सरकारवाडा - सीबीएस सिग्नल, शरणपूररोड सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल, म्हसरूळ - राऊ हॉटेल सिग्नल, सातपूर - कार्बन नाका हे अपघाताचे ब्लॅक स्पॉट आहेत़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस