शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

राजकीय पक्षांसमक्ष मतदान यंत्रांची सरमिसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 1:12 AM

गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात सातत्याने एकाच पक्षाच्या होणाऱ्या विजयामुळे निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर राजकीय पक्ष व मतदारांकडून घेण्यात येत असलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने विविध प्रयत्न सातत्याने केले.

नाशिक : गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात सातत्याने एकाच पक्षाच्या होणाऱ्या विजयामुळे निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर राजकीय पक्ष व मतदारांकडून घेण्यात येत असलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने विविध प्रयत्न सातत्याने केले. त्यासाठी सर्वच प्रक्रिया पारदर्शी करण्याबरोबरच आता मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जनतेच्या मनातील संशय दूर होण्यास मदत होईल त्याअनुषंंगाने बुधवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पाडली. यावेळी पक्ष प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना सरमिसळची पद्धतीही समजावूनही सांगण्यात आली.जिल्ह्णात प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा २० टक्के जादा मतदान यंत्र संबंधित मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहेत. संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी कशारितीने पूर्ण होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना माहिती दिली.सदर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सरमिसळ प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघनिहाय ४७२० मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५१३ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नोडल अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजश्री अहिरराव, प्रशांत पाटील, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासमवेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.देशाच्या विविध भागातून आली यंत्रेअंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ येथे जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यात आली असून, देशाच्या विविध भागांतून नाशिक जिल्ह्णासाठी ही यंत्रे आणण्यात आली आहेत. यापूर्वीच या यंत्राची चाचणी तज्ज्ञांकरवी करण्यात आली असून, आता कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणते यंत्र पाठवायचे त्याची निवड सरमिसळ पद्धतीने करायची, जेणेकरून कोणलीही शंका राहू नये. यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व व्हीव्हीपॅट यंत्राबाबतच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना असलेल्या सर्व शंकांचे निरसन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक