गुळवंच येथे घनकचरा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:00 IST2020-03-03T16:59:19+5:302020-03-03T17:00:27+5:30
गुळवंच येथे स्वच्छ भारत अभियान कक्ष अंतर्गत गुळवंच विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील एस. एस. के. विद्यालयात स्वच्छ भारत अभियान कक्ष अभियानांतर्गत मार्गदर्शन करतांना शिवहर बेलगुरे. व्यासपीठावर मधुकर काळे, सरपंच केशव कांगणे, माजी सरपंच भाऊदास सिरसाट, वृषाली सानप, चंद्रकांत घरटे आदि.
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच येथे स्वच्छ भारत अभियान कक्ष अंतर्गत गुळवंच विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान कक्ष’ अंतर्गत नुकतेच गुळवंच येथील एस. एस. एस. विद्यालयात प्रात्यक्षिक व दृकश्राव्य माध्यमांच्या आधारे शालेय विद्यार्थी व शिक्षकांना स्वच्छतेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिवहर बेलगुरे यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींच्या सहाय्याने घनकचरा व्यवस्थापन, बायोगॅस निर्मिती, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकचे निर्मुलन, झीरो गार्बेज, झीरो डिम्पंग, शाळा परिसर स्वच्छता व ग्रामस्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करतेवेळी शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या कल्पना जाणून घेतल्या व सर्व शिक्षक व विद्यार्थी यापुढे ‘स्वच्छ भारत अभियान कक्ष’ या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता अभियान, निरोगी आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी कटीबद्ध राहू असे मुख्याध्यापक एम. डी. काळे यांनी आश्वासन दिले.
यावेळी सरपंच केशव कांगणे, माजी सरपंच भाऊदास सिरसाट, वृषाली सानप, चंद्रकांत घरटे, शरद केदार, भास्कर रेवगडे, दत्तात्रय रेवगडे, संजय सानप, छाया सांगळे, रवींद्र कांगणे, सुरेखा जगताप, संदीप धूम, ललीत रत्नाकर, नवनाथ सानप, मारुती सानप व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.