संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:25 IST2018-11-27T18:24:47+5:302018-11-27T18:25:23+5:30
संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.

संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे
त्र्यंबकेश्वर : संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आयोजित केलेल्या ६८व्या संविधान दिनाच्या निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्र म भारतीय जनता पार्टी तर्फे माजी नगराध्यक्ष रविन्द्र सोनवणे ,नगरसेवक त्रिवेणी सोनवणे तुंगार यांनी केले होते. गंगाधर अहिरे यांनीडॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील संघर्ष आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत विशद करतांना बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग संघर्ष उभे केले. आपल्या संविधानातुन त्यांनी देशाला समाजवाद संमिश्र अर्थ व्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशाला एकप्रकारे देणगी दिली अअसल्याचेअहिरे यांनी सांगितले.
कार्यक्र माचे अध्यक्ष अॅड.श्रीकांत गायधनी कार्याध्यक्ष त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी भुषिवले होते. तर प्रमुख अतिथी सुनिल बच्छाव ,राजेन्द्र चंद्रमोरे प्रभाकर पगारे ,नितीन भालेराव , कौशल्या लहारे , स्वप्निल शेलार नितीनजाधव ,े चंद्रकांत गायकवाड , शामराव गंगापुत्र, समिर पाटणकर दत्ता जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील बच्छाव यांनी केले. तर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर म्हणाले संविधानाने दिलेले अधिकार आता प्रत्यक्ष कृतीत उतरविले पाहिजेत. तर मधुकर वाघ म्हणाले राज्य कारभार कसा करावा हे ज्या राष्ट्रीय ग्रंथात लिहिले आहे तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. म्हणुन भारतीय संविधान संपुर्ण जगात आदर्शवत् आहे.
या कार्यक्र माचे सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. तर कार्यक्र माचे संयोजन दिलीप सोनवणे रत्नाकर खाटीकडे अविनाश चंद्रमोरे रमेश दोंदे पवन सोनवणे व पंचशील मित्र मंडळाचे सर्व सदस्य आदींनी केले होते.
या कार्यक्र मास अखिल भारतीय बौध्द महासभेचे शंकरमामा शिंदे भागवत गांगुर्डे हरीभाऊ अंबापुरे मधुकर कडलग सुरेश काशिद शशांक तिवडे हरीभाऊ सोनवणे दत्ता सोनवणे आदी उपस्थित होते.