सामाजिक कार्यकर्ते सोमबाबू अग्रवाल यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 10:09 IST2022-06-17T10:09:30+5:302022-06-17T10:09:39+5:30

आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Social activist Sombabu Agarwal passes away | सामाजिक कार्यकर्ते सोमबाबू अग्रवाल यांचे निधन 

सामाजिक कार्यकर्ते सोमबाबू अग्रवाल यांचे निधन 

नाशिक - जुन्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष तसेच शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सोमबाबू अग्रवाल यांचे रात्री साडे अकरा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अत्यंत मितभाषी आणि मनमिळाऊ  स्वभावाचे सोमबाबू अग्रवाल सामाजिक राजकीय क्षेत्रात सुपरिचित होते नाशिकच्या जुन्या पीपल्स बँकेचे त्यांनी चेअरमन पद भूषवले होते. महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गठीत झालेल्या शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते अग्रवाल समाजाचे मान्यवर नेते असल्याने त्यांचा समाजात आदरयुक्त दबदबा होता विविध संस्थांचे पद त्यांनी भूषवले तसेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात 4 मुले, 2 मुली जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Social activist Sombabu Agarwal passes away