शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मग महाआघाडीला सिंगल- डबल वॉर्डांची चिंता कशाला?

By संजय पाठक | Updated: January 22, 2021 17:58 IST

नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीचे पडघमसाऱ्यांचे स्वबळाचे नारेवार्ड रचनेत मात्र सेायीची संख्या हवी

संजय पाठक, नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे समीकरण अस्तित्त्वात आले. मुंबई महापालिकेसह राज्यात सर्वत्र महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार असल्यांचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ते शक्य होईल काय, याविषयी शंका आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील अशीच चर्चा होती. या निवडणुका प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढवल्या जात नाहीत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हेच पक्ष पॅनल करून एकमेकांच्या विरेाधात होते. महापालिकेच्या निवडणुकांना तर आणखी अवकाश आहे. परंतु शिवसेना ठीक आहे. परंतु सहा- सहा नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील स्वबळाची भाषा केली आहे.स्वबळाची भाषा करणे ठीक. मात्र, प्रभाग रचना कशी असावी, याबाबत मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली. तर शिवसेना आणि काँग्रेसने व्दिसदस्यीय प्रभाग पध्दतीची मागणी केली आहे. मुळात अशा प्रकारे आग्रह धरणारा पक्ष म्हणजे एकेकाळचे भाजप- सेनेचीच होती. राज्यात पहिल्यांदा युती सत्तेवर आल्यानंतर महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीची रचना केली होती. त्यावरून ओरड झाली खरी मात्र नंतर कधी व्दिसस्यीस, तर कधी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. आता राज्यात सत्ता असताना भाजपने आणि त्याच वेळी शिवसेना युती म्हणून सत्तेत असताना २०१७ च्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग करण्यात आले. परंतु विद्यमान सरकारने ही रचना बदलण्याचे ठरवल्यानंतर खरे तर शिवसेना आणि काँग्रेस या देान्ही पक्षांनीराष्ट्रवादीची री ओढायला हवी होती. स्वबळाइतके सक्षम उमेदवार असतील तर दोन उमेदवारांना घेऊन एकाच्या आधाराने दुसरा निवडून आणण्याची मुळातच गरज नाही. त्यातच एक सदस्यीय प्रभाग पध्दतीत भाजप मागे पडते म्हणून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीला सुरूवात झाली असेल तर हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडणारा नाही काय, असा प्रश्न आहे. खरे तर स्वबळ असेल तर कोणत्याही प्रकारची रचना असेल तर लढण्यास सज्ज असलेच पाहिजे, परंतु कार्यकर्त्याच्या उत्साहात भर घालताना दुसरीकडे मात्र स्वबळाची वस्तुस्थिती दाखवली जात आहे, हे तितकेच खरे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूक