‘...तर आम्ही आत्महत्त्या थांबवू शकतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 02:51 PM2019-10-13T14:51:11+5:302019-10-13T14:52:10+5:30

लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

'... So We Can Stop Suicide' | ‘...तर आम्ही आत्महत्त्या थांबवू शकतो’

‘...तर आम्ही आत्महत्त्या थांबवू शकतो’

Next

नाशिक : तरूणाईमध्ये विविधप्रकारच्या कारणांमुळे ताणतणाव निर्माण होऊन येणाऱ्या नैराश्यापोटी तरूण-तरूणी थेट टोकाचे पाऊल उचलून आत्महत्त्या करत जीवन संपवितात. यामागे मानसिकता बिघडल्याचे मुख्य कारण असते. तरूणाईची मानसिकता विकसीत करून आत्महत्त्या रोखता येणे सहज शक्य असल्याचा सूर ‘आत्महत्त्या प्रतिबंध’ या विषयावर अधारित चर्चासत्रात उमटला.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सुदृढ ठेवत ‘आम्ही आत्महत्त्यांना प्रतिबंध घालू शकतो’ असा संदेश भीत्तीपत्रक स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. चर्चासत्र व भीत्तीपत्रक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत दिघावकर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, मानिसक आरोग्य जागरूकतेसाठी मानिसक आरोग्य व्यावसायिकांनी आपली भूमिका ओळखणे गरजेचे आहे. विविध मानिसक आरोग्याशी संबंधित मुद्द्यांविषयी समुपदेशन व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी आध्यात्मिक मनोविज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी परिसंवाद आणि आत्महत्या रोखण्यासाठी माहितीपट दाखविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी चांगल्याप्रकारे प्रबोधनात्मक भीत्तीपत्रके सादर करणा-या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. के. एच. कापडणीस, डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ एन.व्ही. देशमुख, डॉ. योगेश वानखेडे, अश्विीनी केदारे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. मृणाल भारद्वाज यांनी केले.

Web Title: '... So We Can Stop Suicide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.