शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

...म्हणून नाशिकचा गवळीपाडा झळकला राज्यात दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:30 IST

जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्दे ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली

नाशिक : ‘हजार हातांनी देणा-या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला असून नैसर्गिक ऋुतूचक्रही बिघडले आहे. याची जाणीव ठेवत वनांचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातीनल ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) या गावाने वनसंवर्धन करत ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली. तसेच २०१४-१५साली ७५ हेक्टरवर रोपवनदेखील विकसीत केले. राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत ७५ हेक्टरवर पुन्हा या गावाने रोपवन घेतले. तसेच जल व मृदा संधारणाची कामे वनविभागाच्या साथीने पुर्ण केल्यामुळे गवळीपाड्याला संत तुकाराम वनग्राम योजनेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळविता आला.गवळीपाडा (महाजे) या भागातील लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून साग जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. त्यामुळे गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. संत तुकाराम वनग्राम योजनेसाठी हे गाव पुढील वर्षासाठी राज्यस्तरीय फेरीकरिता पात्र झाले आहे. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांनी दिली.जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतक-यांना घेणे शक्य होत आहे. जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.२०११-१२ सालापासून येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नागरिकांनी पुढाकार घेत ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराई, कुºहाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. वनपरीक्षेत्र अधिकारी रविंद्र भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव वनपाल आर.व्ही.देवकर,वनरक्षक हिरामण चौधरी यांनी लोकसहभागातून २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले.

...असे केले निसर्गसंवर्धनजंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकारदरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धनजंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले.वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली.जंगलात होणारी घुसखोरी थांबविली.चराई व कु-हाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला. 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकNatureनिसर्गenvironmentपर्यावरणwildlifeवन्यजीव