शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

By Admin | Updated: November 18, 2016 22:08 IST2016-11-18T22:09:02+5:302016-11-18T22:08:48+5:30

शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

Snake at the school cooking house | शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

शाळेच्या स्वयंपाक गृहात निघाला नाग

 तरसाळी : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वयंपाक घरात काल दुपारी दिड वाजेच्या सुमारास शाळेत नाग निघाल्याने काहि काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.यामुळे शाळेतिल मुलांचा संरक्षणाचा व जिवीताचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
काल दुपारी मुलांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी मदतनीस अलका पिंपळसे या स्वयंपाक घरात गेल्यावर त्यांना हा नाग चुलीवर बसलेला दिसला. मुख्याध्यापक चित्ते यांना याची माहिती दिली. चित्ते यांनी नागरिकांना बोलावत नागाला ठेचून ठार मारले . माञ शाळेला चहोबाजुकडुन मोठमोठया काटेरी झुडपानी व्यापलेले आहे. घाण कचरा याचे असल्याने उंदीर, घुशीचे प्रमाण जास्त आहे .वेळोवेळी हि झाडे व हि घाण काढण्यासाठी सांगण्यात आले माञ कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळेला वालकंपाऊड नसल्यामुळे परिसरातील भटक्या कुञाचाहि ञास वाढला आहे.लवकरात लवकर या उपाय योजना करु न मुलाच्या जीविताला धोका निर्माण होणार नाहि याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Snake at the school cooking house