इंदिरानगरला चंदनवृक्षावर तस्करांनी फिरविला कटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:01 IST2020-02-05T14:00:50+5:302020-02-05T14:01:12+5:30

या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रूपये किंमतीचे ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Smugglers cut off Indiranagar on sandalwood tree | इंदिरानगरला चंदनवृक्षावर तस्करांनी फिरविला कटर

इंदिरानगरला चंदनवृक्षावर तस्करांनी फिरविला कटर

ठळक मुद्देयुवकाच्या हातातील मोबाईल हिसकावला

नाशिक : काही दिवसांपुर्वीच एका कारखान्यातील चंदनवृक्ष चोरट्यांनी कापून गायब केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सिमेन्स कॉलनीमधील एका बंगल्याच्या आवारातील दहा फूट उंचीच्या चंदनाच्या झाडावर अज्ञात तस्करांनी कटर चालविल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्रसिंग यादवसिंग राजपुत (६९,रा.विराज हौसिंग सोसा.) या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रूपये किंमतीचे ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

युवकाच्या हातातील मोबाईल हिसकावला
नाशिक : गंगापूररोडवर परिसरातून पायी जात असलेल्या एका युवकाच्या हातातील मोबाईल अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.४) संध्याकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रतिक साहेबराव खैरनार (२१,रा. उत्सव अपार्टमेंट, पुर्णवादनगर ) याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Smugglers cut off Indiranagar on sandalwood tree