हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:59 PM2018-08-18T22:59:09+5:302018-08-18T22:59:49+5:30

कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

Smart school was held at Hattoore School | हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट !

हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट !

Next
ठळक मुद्देएक हात मदतीचा उपक्र म : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हातनोरे येथे स्वातंत्र्य दिन अभिनव उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चारोस्कर व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंबंधी संदेश देत पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पवार व जलनायक योगेश बर्वे यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष प्रकाश बर्वे यांनी भारताच्या क्रांतिकारकांच्या इतिहासरूपी माहितीद्वारे एकता, बंधुभाव, संघटनेतून विकास साधावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना केले.
हातनोरे गावात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जालिंदर कानडे, जालिंदर जाधव, चेतन कानडे, प्रवीण चव्हाण, अक्षय इंगळे, रोहित कानडे, मुख्याध्यापक खोटरे व शिक्षक उपस्थित होते. लहान-मोठ्यांचे वाढदिवस किंवा स्मृतिदिनानिमित्त ‘एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा’ या योजनेंतर्गत नीलेश लोमटे यांनी शाळेला १६ महान व्यक्तींच्या व समाजसुधारकांच्या प्रतिमा, नाशिक आयमा व अविनाश बोडके यांनी शालेय स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दहा कचरापेटी व १० फुलझाडांच्या कुंड्या, चौघुले यांनी प्रशस्त साउण्ड सिस्टीम, शिक्षक व ग्रामस्थांकडून कपाटे आदी वस्तू शाळेला भेट दिल्या.

Web Title: Smart school was held at Hattoore School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक