शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’च्या कंपनीची होणार पुनर्रचना

By admin | Updated: March 19, 2017 00:37 IST

नाशिक : केंद्र शासनाच्या नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांसह सुमारे ११ नगरसेवकांचा संचालक म्हणून समावेश करावा लागणार आहे.

 नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने विशेष उद्देश वाहन अर्थात स्पेशल पर्पज व्हेइकलअंतर्गत स्थापन केलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत आता नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांसह सुमारे ११ नगरसेवकांचा संचालक म्हणून समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे कंपनीची पुनर्रचना होणार असून, कंपनीवर जाण्यासाठी सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये रस्सीखेच बघायला मिळणार आहे.महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकासकामांसाठी स्वतंत्र कंपनीची नोंदणी करत तिची सप्टेंबर २०१६ मध्येच स्थापना केली आहे. नाशिक महापालिका व राज्य शासन यांच्या संयुक्त भागीदारीत ही कंपनी कार्यरत आहे. सदर एसपीव्हीला महासभेने सुरुवातीला तीव्र विरोध केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता यामुळे धोक्यात येणार असल्याची हाकाटी पिटत सदस्यांनी त्यात महापौर-उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांचा संचालक म्हणून समावेश करण्याची अट घातली होती. या अटी-शर्तींवरच महासभेने एसपीव्हीला मान्यता दिलेली होती. त्यानुसार, सरकारने त्यात बदल करत पदाधिकाऱ्यांचाही समावेश करण्यास मान्यता दिली होती. सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने एसपीव्हीची स्थापना करताना त्यात नामनिर्देशित संचालक म्हणून तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेता सुरेखा भोसले आणि विरोधी पक्षनेता कविता कर्डक यांची नियुक्ती केली होती, तर अन्य सहा नगरसेवकांचीही राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार नियुक्ती केली जाणार होती. दरम्यान, कंपनीवर राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांची नियुक्ती होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली एकमेव बैठक झाली. या बैठकीला संबंधित संचालक मंडळ उपस्थित होते. त्यानंतर मात्र, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीचे कामही बाजूला पडले होते. आता महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती कंपनीच्या संचालक मंडळावर करावी लागणार आहे. त्यानुसार, महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांची नियुक्ती होणार असून, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता व विरोधी पक्षनेता यांच्याही नियुक्तीनंतर त्यांचा कंपनीत संचालकपदी समावेश केला जाणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार सहा नगरसेवकांनाही कंपनीवर संधी मिळणार आहे. त्यामुळे कंपनीवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांना वेध लागले आहेत. सदर कंपनीला पाच वर्षांत सुमारे ९०० कोटी रुपये प्राप्त होणार असून, त्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. दरम्यान, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्या नावाची शिफारस आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली असून, त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विजय पगार यांचा महापालिकेतील सेवा कालावधी ३ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आला असून, नव्या प्रशासन उपआयुक्ताची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)