शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:05 IST

Maharashtra Election 2019 या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे

ठळक मुद्देपरिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील ३३१ गुंडांचा समावेश मध्यवर्ती कारागृहात ९ गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले ५५ गुंड शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार

नाशिक : विधानसभा निवडणूकीचे मतदान येत्या सोमवारी (दि.२१) करण्यासाठी अवघे नाशिक सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील ३३१ गुंडांचा समावेश आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा मतदानाचा हक्क प्रशासनाने अबाधित ठेवला आहे.विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहर व परिसरात सर्वत्र शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. अतिरिक्त वाढीव पोलीस बंदोबस्तासह निमलष्करी दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. गुन्हेगारांचा पूर्वइतिहास लक्षात घेत गंभीर स्वरूपाच्या शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुंडांना थेट जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेच्या महिनाभराच्या कालावधीत एकूण ५५ गुंडांना शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार करण्यात आले आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३३१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शनिवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून काढता पाय घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे; मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुन्हा मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि.२४) शहर सोडणे बंधनकारक असल्याची माहिती उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. तसेच सातपूरमधील संघटितपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या कल्पेश दिपक वाघ याच्यासह त्याच्या साथीदारांनाही शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर ९ गुन्हेगारांविरूध्द पोलीस आयुक्त विश्वास नागंरे पाटील यांच्या आदेशान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील