गोवंशाची कत्तल करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:00 IST2019-02-12T00:59:52+5:302019-02-12T01:00:57+5:30
जुने नाशिकमधील बागवानपुरा परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसविक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोवंशाची कत्तल करणाऱ्यास अटक
नाशिक : जुने नाशिकमधील बागवानपुरा परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसविक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी पालकांच्या हवाली केले आहे.
रविवारी (दि. १०) सकाळी त्याने बागवानपुरा येथील संजय अपार्टमेंटमधील गाळ्यासमोर गोवंशीय प्राण्याची कत्तल करून मांसविक्र ी करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई राजेश महाले यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.