शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

गरवारे पॉइंटजवळ झाडांची कत्तल

By admin | Updated: October 11, 2015 22:26 IST

मनपाचे दुर्लक्ष : स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉइंटजवळ असलेल्या एका हॉटेलच्या परिसरातील चंदनाच्या झाडासह १० ते १५ मोठ्या झाडांची विनापरवानगी कत्तल करण्यात आली. याबाबत जीवन नागरी पर्यावरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, मनपाकडे तक्रार करणार आहे.गरवारे पॉइंटजवळील एक हॉटेलच्या परिसरात अनेक झाडे आहेत. या झाडांपैकी १० ते १५ झाडे ही मोठ्या प्रमाणात छाटण्यात आली आहेत, तर काही झाडे बुडापासूनच तोडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, यात एक चंदनाचेही झाड असल्याचे सांगण्यात येत आहे. या झाडांची छाटणी करण्याबाबत हॉटेल व्यावसायिकाने मनपाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. या झाडांची परवानगी न घेता छाटणी केल्याप्रकरणी जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आबा पाटील मनपाकडे तक्रार अर्ज करणार आहेत. मनपाचा उद्यान विभाग हा नावापुरताच उरला असून, या विभागातील अधिकारी व कर्मचारी कोणतेही काम करीत नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.गरवारे पॉइंटजवळील एका हॉटेल व्यावसायिकाने मनमानी कारभार करीत हॉटेलच्या आतील परिसरात असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्याने याबाबत मनपा काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)