येवल्यात स्लॅबचा भाग कोसळला; महिला जखमी, बालक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:43 IST2020-03-21T00:43:39+5:302020-03-21T00:43:58+5:30

येवला येथील चुनाभट्टी परिसरातील महात्मा फुलेनगर येथे एका घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात घरात झोपलेल्या महिलेस किरकोळ दुखापत झाली असून, महिलेच्या दीड वर्षाच्या बाळास सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

The slabs were smashed when they arrived; Woman injured, child rescued | येवल्यात स्लॅबचा भाग कोसळला; महिला जखमी, बालक बचावले

येवल्यात स्लॅबचा भाग कोसळला; महिला जखमी, बालक बचावले

येवला : येथील चुनाभट्टी परिसरातील महात्मा फुलेनगर
येथे एका घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात घरात झोपलेल्या महिलेस किरकोळ दुखापत झाली असून, महिलेच्या दीड वर्षाच्या बाळास सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. ही घटना शुक्रवारी (दि.२०) घडली.
सुजाता सुदर्शन शिंदे (२५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. येथील वसाहतीबाबत रहिवाशांनी नगरपालिकेला अनेकदा दुरुस्तीसाठी निवेदने दिली आहेत, मात्र त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने आता तरी गांभीर्याने घेऊन या वसाहतीची दुरुस्ती करण्याची मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, अनिल गायकवाड, गणेश गुंजाळ, सुदर्शन शिंदे, विमल गायकवाड, जया गायकवाड, पूजा गुंजाळ, अण्णा नागपुरे आदींनी केली
आहे.

Web Title: The slabs were smashed when they arrived; Woman injured, child rescued