शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:33 AM

जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली.

पंचवटी : जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली. कामदा एकादशीनिमित्ताने होणाऱ्या या रथोत्सवात भाविकांचा लक्षणीय सहभाग होता.नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया यंदाच्या उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते गरुडरथात रामाच्या पादुका व रामरथात भोगमूर्ती प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. बुवांनी आदेश देताच हिरवा ध्वज दाखवून पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात झाली.प्रारंभी रथाच्या मानकऱ्यांना गंध लावून श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. राममंदिरातून भोगमूर्तीची व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही रथ रांगेत उभे करण्यात येऊन श्रीकांतबुवा यांच्या हस्ते मुख्य आरती होताच फटाक्यांची आतषबाजी करून पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात झाली. सुरुवातीला गरु डरथ व काही वेळाने रामरथ निघाला. रथाच्या अग्रभागी पालखी तर मध्यभागी श्रीकांतबुवा रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत होते. दरम्यान, रथयात्रा सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जयंत जाधव, शोभा बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी महापौर दशरथ पाटील, डॉ. सुनील ढिकले, अ‍ॅड. राहुल ढिकले, गुरमित बग्गा, प्रियंका माने, उद्धव निमसे, रूची कुंभारकर, राकेश शेळके, नितीन शेलार, सचिन लाटे, मंदार जानोरकर, मंडलेश्वर काळे, अजय निकम, आदींनी दर्शन घेतले.गरुड व रामरथाचे सूत्रसंचालन रघुनंदन मुठे, चंदन पुजारी यांनी केले. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायामशाळा, समस्त पाथरवट समाजातील पंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.रथयात्रा मार्गराममंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, चारहत्ती पूल, काट्या मारुती चौक, जुना आडगावनाका मार्गे, गणेशवाडीमार्गे गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगणापर्यंत काढण्यात आली. रामरथ नदी ओलांडत नसल्याने रथ म्हसोबा पटांगणावर थांबविण्यात आला. गरुडरथ नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, धुमाळ पार्इंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, भांडीबाजार, कपूरथळा मैदान परिसरातून मिरविण्यात आला नंतर दोन्ही रथ रामकुंड येथे आणले तेथे ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.रथोत्सव मार्गावर महिला भाविकांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या, तर रथाचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा फलक लावले होते. रथोत्सवात सहभागी झालेल्या महिलांनी पिवळ्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. रामभक्तांनी अंगावर पांढरा सदरा परिधान करून फेटा, कपाळावर अष्टगंध लावले होते. गरुडरथ मान अहिल्याराम व्यायामशाळा, तर रामरथ मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ पाथरवट समाजाकडे असल्याने मानकरी रथाच्या अग्रभागी रथ ओढत होते. रथोत्सवात ढोलपथक, सहभागी झाले होते. रामरथाला एलइडी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.नाशिकचा ग्रामोत्सवदरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने निघणाºया श्रीराम व गरूड रथयात्रेसाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ काळाराम मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांवर रामभक्तांची मोठी गर्दी झाली होती़ भगवे ध्वज हातात घेऊन नाशिकच्या या ग्रामोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या गर्दीमधून प्रभूरामचंद्रांचा जयघोष घुमत होता़

टॅग्स :kalaram templeकाळाराम मंदीरNashikनाशिक