खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 07:10 IST2026-04-04T07:10:45+5:302026-04-04T07:10:45+5:30
हाच सराफ व्यावसायिक सोन्याची हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे.

खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
नाशिक : एसआयटीने भोंदू अशोक यातील दोन मोबाइलमधील डेटा रिकव्हर खरातचे तीन मोबाइल जप्त केले असून, करण्यात आला आहे. एका मोबाइलमध्ये राज्यातील बड्या राजकीय व्यक्तींचे खरातला कॉल आल्याचे उघड झाल्यावर जप्त केलेल्या दुसऱ्या मोबाइलमधूनही खरातचे अनेक कांड बाहेर आले आहेत.
यातील एका मोबाइलमध्ये खरातच्या सीएकडे १० तासांच्या थाटात झालेल्या पूजेचे काही व्हिडीओ एसआयटीने तपासले असून, यात भारत अन् दुबईत सराफा व्यवसायात बस्तान बसविलेल्या एका व्यावसायिकाचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
हवालामार्फत काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा
हाच सराफ व्यावसायिक सोन्याची हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. त्याच्याच मार्फत खरात हवाला रॅकेट चालवित असल्याचा संशय आहे. काळे पैसे पांढरे करण्याचा धंदा या सराफ व्यापाऱ्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरात करीत असण्याची शक्यता आहे.
सीएच्या निवासस्थानी पूजा
सीएच्या पुण्यातील निवासस्थानी ही पूजा खरातच्या देखरेखीखाली झाली होती. पूजेसाठी त्याचे अनेक भक्त उपस्थित होते. खरात भक्तांना पूजा करायला लावत असे. यातून भक्तांच्या मनात भीती घालून लाखो रुपयांची अंगठी, खडे घेण्यास भाग पाडत असे. खरातकडे सापडलेल्या चारही मोबाइलमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर खरातसोबत अनेक अनोळखी लोक दिसत असून, त्यातील काही जण जमीन, सावकारी व्यवसायाशी निगडित आहेत. या चारही मोबाइलचा वापर खरात आर्थिक घोटाळे करण्यासाठीच करीत असल्याचा संशय आहे.
वृद्धाश्रमासाठी ६० लाखांची जमीन २२ लाखांत लाटली
सिन्नरमधील कांदा व्यापारी असलेल्या फिर्यादीची पाथर्डी ते गौळाणे रोडवरील मोक्याची ६० लाखांची जमीन अवघ्या २२ लाखांत खरेदी केली. तेवढ्यावरच भोंदू अशोक खरात थांबला नाही, नंतर त्याने फिर्यादीला तुला चांगला प्लॉट घेऊन देतो, असे सांगून फिर्यादीकडून ८५ लाख रुपये घेतले.
हे पैसे खरातने परत केले नाहीत अशी नवीन तक्रार दाखल झाली आहे. ही जमीन खरातने मुलीच्या नावावरच घेतली. मात्र आजतागायत त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे वृद्धाश्रम उमे राहिलेले नाही. याच जमिनीचे बाजारमूल्य आज चार ते पाच कोटीपर्यंत आहे.