शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला उमेदवारांपेक्षा ‘नेत्यांची’च प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: November 12, 2016 22:26 IST

लक्षवेधी लढत : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत दुरंगीच होणार

 शैलेश कर्पे  सिन्नरथेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे उमेदवार किरण डगळे व भाजपाचे अशोक मोरे यांच्यात रंगणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा आजी-माजी लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर पाच उमेदवार शिल्लक राहिले. त्यापैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक पंचरंगी होत असल्याचे कागदोपत्री दिसते. या निवडणुकीसाठी भाजपाचे अशोक रंगनाथ मोरे, शिवसेनेचे किरण विश्वनाथ डगळे, कॉँग्रेसच्या लता मनोहर हिले, मनसेचे राजेंद्र सुकदेव बोरसे व अपक्ष वसंतराव खंडेराव नाईक हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.नगरपालिकेवर सध्या माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सत्ता आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी आमदार कोकाटे यांनी कंबर कसली आहे. कोकाटे कधी नव्हे एवढ्या उत्साहाने या निवडणुकीत कामाला लागल्याचे दिसते. तर सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्याचा चंग आमदार राजाभाऊ वाजे यांनी बांधला आहे. अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने वाजे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार देतांना त्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते. निवडणुकीसाठी ४० हजार ५०० मतदार मतदान करणार आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारात सिन्नरचे सुज्ञ व जागरुक मतदार वाजे किंवा कोकाटे यांची छबी पाहणार असल्याने उमेदवारापेक्षाच आजी-माजी लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. गेल्या दोन थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर लोकांनी पक्षापेक्षा व्यक्तीलाच पसंती दिल्याचे दिसते. या दोन्ही निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाची धुरा सिन्नरकरांनी चांडक परिवाराकडे सोपवली होती.