पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा सिन्नरला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 23:20 IST2022-04-09T23:19:35+5:302022-04-09T23:20:19+5:30
सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिन्नर येथे जाहीर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करताना सिन्नर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.
सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिन्नर येथे जाहीर निषेध करण्यात आला.
या हल्ल्याचा कटकारस्थान, षडयंत्र रचणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. जाधव यांना माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष सुभाष कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता हांडे, प्रशांत सोनवणे, किरण चतूर, सुभाष काळे, पंकज जाधव, देवेंद्र आवारे, दर्शन कासट, मेघा दराडे, वामनराव गाडे, उमेश गायकवाड, बाळासाहेब कमानकर, खंडेराव रानडे, राजाराम मुंगसे, संदीप साळवे, दत्ता वायचळे, दीपक मुरकुटे, राजू गटकळ, महेश गायकवाड, शैलेश गायकवाड, स्वप्नील कोतवाल, अजित सोनवणे, अक्षय उगले, सचिन गायकवाड, परशराम राजगुरू, गोरख मंडले, देविदास कातकाडे आदी यावेळी उपस्थित होते.