सिन्नरला भरधाव ट्रकच्या धडकेत युवा हॉटेल व्यावसायिक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:37 IST2019-06-29T17:37:02+5:302019-06-29T17:37:16+5:30
सिन्नर : हॉटेलवर थांबलेल्या खासगी ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सिन्नरच्या गावठा भागात घोटी चौफुलीजवळ पहाटेच्या सुमारास सदर अपघात झाला.

सिन्नरला भरधाव ट्रकच्या धडकेत युवा हॉटेल व्यावसायिक ठार
सिन्नर : हॉटेलवर थांबलेल्या खासगी ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सिन्नरच्या गावठा भागात घोटी चौफुलीजवळ पहाटेच्या सुमारास सदर अपघात झाला.
राहुल निवत्ती मुंडे (२८) रा. सिन्नर असे या युवा हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. माजी नगरसेवक लता मुंडे यांचा तो मुलगा होता. मुंडे यांचे घोटी चौफुलीवर गावठा भागात मारूती मंदिरासमोर चहा- नास्त्याचे हॉटेल आहे. रात्रभर राहुल प्रवाशांना सेवा देत असतो. शनिवारी पहाटेच्या सुमारास शिर्डीकडे जाणाऱ्या एका प्रवासी वाहतूक करणाºया ट्रँव्हल्समधील प्रवाशांना चहा देण्यासाठी राहुल जात असतानाच मुंबईकडे जाणाºया दहाचाकी भरधाव ट्रकने राहुलला धडक दिली. यावेळी राहुल दोन्ही वाहनांच्यामध्ये सापडला. यात राहुल गंभीर जखमी झाला.त्यास तत्काळ उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले.
समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष संजय काकड यांचा तो भाचा होता. काकड यांनीच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह चालकांना ताब्यात घेतले आहे. राहुल याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.