सिन्नरला कामगार पाल्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:06 IST2019-05-05T18:06:12+5:302019-05-05T18:06:26+5:30
ेसिन्नर : येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील २५ मयत व गरजू कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य, गणवेश व शाळाप्रवेश फी यासाठी प्रत्येकी रूपये २ हजार ५०० मदत देण्यात आली.

सिन्नरला कामगार पाल्यांना मदतीचा हात
ेसिन्नर : येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील २५ मयत व गरजू कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य, गणवेश व शाळाप्रवेश फी यासाठी प्रत्येकी रूपये २ हजार ५०० मदत देण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा झापवाडी येथे फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे अध्यक्ष बाळासाहेब सदगीर, रोटरी क्लब आॅफ सिन्नरचे अध्यक्ष संजय आव्हाड, लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिटीचे अध्यक्ष संजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.