सिन्नरला दुचाकीच्या डिकीतून १ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:16 IST2019-04-26T18:15:54+5:302019-04-26T18:16:58+5:30
गावठा भागातील औषध दुकानातून औषध आणण्यासाठी गेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिकीतून १ लाख रुपये लंपास केल्याची घटना दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नरला दुचाकीच्या डिकीतून १ लाख लंपास
सिन्नर : येथील गावठा भागातील औषध दुकानातून औषध आणण्यासाठी गेल्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिकीतून १ लाख रुपये लंपास केल्याची घटना दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.
डुबेरेवाडी येथील हरिश्चंद्र बहिरू वाजे (५३) हे त्यांच्या मुलीसह भारत जनऔषध मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गेले होते. त्यांनी सेंट्रल बॅँकेतून एक लाख रुपये काढून दुचाकीच्या डिकीत ठेवले होते. मेडिकलमधून आल्यानंतर डिकीतून एक लाख रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.