शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिंडोरी तालुक्यातील एकाच दिवसांत २२ शिवरस्ते झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:00 IST

दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले.

ठळक मुद्देतालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले

दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले.दिंडोरी तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांच्या सहाय्याने तहसीलदार पंकज पवार यांनी कालबध्द नियोजन करून मंगळवारी (दि.३०) दिंडोरी तालुक्यातील एकूण २२ गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पाणंद, पांदणा, शेतरस्ते शिवार, शिवरस्ते मोकळे केलेले आहे.याकरीता तहसिल कार्यालय दिंडोरीचे नायब तहसिलदार संघमित्रा बावीस्कर, अव्वल कारकुन बाहीकर, महसूल सहायक मोहन नांद्रे यांनी कालबध्द कार्यक्रम तयार केला, तालुक्यातील लोकांच्या सहभागातुन आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून घेत तालुक्यातील संबंधित गावचे नागरीक व शेतकरी यांच्या उपस्थित पंचनामा करून ताबा पावती करून सदर रस्तें ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची एकुण लांबी अंदाजे १४ कि. मी. इतकी असुन ९२१ पेक्षा जास्त शेतक-यांना लाभ झाल्याने तालुक्यातील शेतक-यांनी तसेच जनतेने समाधान व्यक्त केले आहे.सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले आहे.अवनखेड येथील गट नंबर ३८४ लगतचा शिवारस्ता, ४०० मीटर, धामणवाडी ते बोपेगाव २०० मीटर, बाडगीचा पाडा ते धोंडळपाडा शिवार रस्ता ७०० मीटर, मानोरी ते ढकांबे शिवरस्ता २०० मीटर, टिटवे येथील शिवरस्ता ३०० मीटर, जांबुटके, नाळेगावं, उमराळे बु. शिवरस्ता ५०० मीटर, गणेशगाव भवर मळा ते पाटचारी लगत ४०० मीटर, वारे ते करंजाळी १५०० मीटर, कोराटे येथील गट क्र. १०१ मधील रस्ता ८० मीटर, दिंडोरी ते वणारवाडी १०० मीटर, जालखेड गट नंबर ३७५ बांधावरील रस्ता १५०० मीटर, पिंगळवाडी ५०० मीटर, चंडिकापूर ७०० मीटर, अहिवंतवाडी ४५० मीटर, खोरीपाडा ते दगडपिंप्री ५०० मीटर, रवळगाव ते बेडकुळे वस्ती २०० मीटर, निगडोळ येथील ५०० मीटर, कादवा म्हाळुंगी शिवरस्ता ८०० मीटर, धाऊर येथील ७०० मीटर, वाघाड डम ते जांबुटके ३००० मीटर, पिपरखेड खंडेराव वस्ती ते पवार वस्ती २०० मीटर, नाळेगाव येथील गावठाण ते नागेश्वर वस्ती ५०० मीटर आदी २२ रस्ते खुले केल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासroad safetyरस्ते सुरक्षा