शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ मूक निदर्शने

By admin | Updated: September 9, 2015 23:51 IST

कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ मूक निदर्शने

नाशिक : प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एच. एम. कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या तपासाबाबत शासन उदासीनता दर्शवित असून, त्याच्या हत्त्येच्या निषेधार्थ डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली.कलबुर्गी यांनी समाजातील अंधश्रध्दा आणि दांभिकता या विषयावर प्रकाशझोत टाकला होता. अंधश्रध्देच्या बंधनातून समाज मुक्त व्हावा, यासाठी ते प्रयत्न करीत होते. अंधश्रध्दा, धर्मांधता आणि दांभिकता जोपासण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, अशा धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी त्यांची हत्त्या केली, असा आरोप या संघटनांनी केला. अशीच हत्त्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शिवाजी महाराजांचे कर्तृत्व खऱ्या स्वरूपात समाजासमोर आणणारे गोविंद पानसरे यांची करण्यात आली.यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. आंदोलनात वसंत हुदलीकर, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. मनीष बस्ते, महेंद्र दातरंगे, केरू पाटील हगवणे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, दत्तू तुपे, निशिकांत पगारे, दीप्ती राऊत, मुकुंद दीक्षित, सचिन मालेगावकर, अ‍ॅड. जे. टी. शिंदे, पी. बी. गायधनी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या तिघांची हत्त्या करणारे सूत्र एकच असून, समाजातील विवेक व समतेचा पुरस्कार दडपून टाकायचा हा त्या मागील हेतू आहे. सरकार या घटनांमधील गुन्हेगारांना पकडण्याबाबत उदासीन आहे, असा आरोप करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.